मंगलाचा चेहरा क्षणभर विचारमग्न झाला. पण क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी ती किशोरला म्हणाली, "एक ध्यानात ठिवजो बेटा, कायबी झालं, आकाशबी कोसळलं, तरीबी तू हिंमत हारायची न्हाई! तू आत्ताच हिम्मत हारला तर कसं चालीन? तुह्यवानं पुर्ं आयुष्य जानंय बारे? कसा करशील मंग? तुह्या दादाकडे पाह्य, सहा हजर रुप्या करिता त्ये निस्ती वनवन भटकी राह्यले, तुम्हाले नोकरदायले काम केलं, तर पैशे भेटायची खात्री तरी राहते, आम्हाले शेतकऱ्यायले तर ते बी नाय नं भो! कधी काह्य व्ही जायीन काई भरोसा नी! आन मी इचारती नी, तं तू बोलता बी नी माले..."
- लेखक: अदित्य चंद्रशेखर, कथा: पेरा प्रकाशित अंक: १० जून २०१२

 

 

   Classical Dance

Nritya Sangam
 

Forgot Password?

New User? Sign Up
  Popular Blogs
  image   एक भिजला रविवार! (151)
  image   छत्रपती आणि आपण (134)
  image   टाईमपास (129)
  image   पहारेदार (127)
  image   आनंदऋतू विषयी दोन शब्द… (118)
  image   हापूस (115)
  image   उंबराचे फूल (77)
  image   आरसपानी (72)

  Popular Events
  image   MK3 - Historical maritime trail to western sea coast of Maharashtra (5947)
  image   Trek to MAHULI with 21 TREKKERS on SUNDAY 28th JULY 2013. (758)
  image   Formal Grand Opening (192)
  image   Aanandrutu Weekly Meeting (146)

  Popular Reviews
  image   Shivaji Underground Bhimnagar Mohalla (1216)
  image   White Lily & Night Rider (1173)
  image   Coming Soon (1111)
  image   Katha Don Ganpatraoanchi (839)
  image   U Turn (691)

  Popular Interviews
  image   लवकरच येत आहे... (510)

  Read Aanandrutu E-Magazine
image  
Aanandrutu
Pages: 25
Sign up today and get Aanandrutu E-Magazine at your email on 10th of every month.

दर्जेदार कथा आणि कवितांनी सजलेलं मराठीतील अग्रगण्य व न चुकता दर महिन्याच्या १० तारखेला प्रकाशित होणारे एकमेव ई-मॅगझिन. आनंदऋतू ई-मॅगझिन व मोफत ई-बुक्ससाठी आजच सभासद व्हा.

नोंदणीसाठी वेबसाईट:
http://aanandrutu.com/registration.php

साहित्य पाठवण्यासाठी ईमेल: 
aanandrutu@gmail.com;

फेसबुक पेज: 
https://www.facebook.com/groups/aanandrutu/ 

Read More...


  Latest Play Review
image
Shivaji Underground Bhimnagar Mohalla

शिवाजी महाराजांनी भूतलावर आरंभलेल्या स्वराज्य प्रतिष्ठापनेच्या कार्याची महती स्वर्गापर्यंत पोहचते आणि शिवप्रभूंच्या कार्यपुण्याईने आता आपलं सिंहासन डळमळित होईल की काय? अशी भिती साक्षात देवाधिदेव इंद्राला वाटू लागते. त्यामुळे भुतलावर शिवाजी महाराजांना त्यांच्या कार्यकर्तुत्वाने देवाचा दर्जा मिळण्याच्या आधीच त्यांना भूतलावरून उचलून आणण्याची जबाबदारी तो मृत्यु देवता यमास सोपवतो. यम थोड्याश्या नाराजीनेच या कामगिरीवर निघतो. शिवाजी महाराजांना अजून काही काळ भूतलावर मिळावा अशीच त्याची मनोमन इच्छा असते. पण देवराज इंद्राच्या देवाज्ञेसमोर त्याचाही नाईलाज होतो. दु:खी कष्टी मनाने तो शिवाजी महाराजांचे प्राणहरण करण्यासाठी भूतलावर पोहचतो आणि महाराजांना देवाज्ञा सांगून चलण्याची विनंती करतो.


शिवाजी महाराज अजून बरीच कार्ये अपूर्ण राहिली आहेत या चिंतेने "अरेरे! घात झाला!" असे उदगारून यमास, "अजून काही समय मिळणार नाही का?" असे विचारून पाहतात. पण यम इच्छा असूनही त्याचा देवाज्ञेपुढे नाईलाज असल्याचे सांगतो, तेव्हा शिवाजी महाराज नाईलाजाने यमाबरोबर स्वर्गास जाण्यास निघतात. शिवाजी महाराजांच्या अशा अकाली अनपेक्षित मृत्यूने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरते आणि सर्वत्र अवकळा पसरते. जनता शोकाकूल आणि हवालदिल होते. इकडे यमासोबत स्वर्गाच्या दिशेने चाललेले शिवाजी महाराज अर्ध्या वाटेत यमास पटवून देण्यात यशस्वी होतात की, "एक दोन अति महत्वाची कामे राहिली आहेत. तेवढी एक दिवसात मी उरकून आलो तर नाही का चालणार?" यम आधीपासूनच शिवाजी महाराज आणि त्यांच्या लोककार्याचा चाहता असतो. तो शिवाजी महाराजांची एवढी विनंती अव्हेरू शकत नाही. यम शिवाजी महाराजांस एका दिवसात कामे आटपून परत येण्यास सांगतो. त्या बदल्यात जामिन म्हणून शिवाजी महाराज त्यांच्या शिरावरील मंदिल (नाटकात यास जिरेटोप म्हणून संबोधले आहे. पण वास्तवात त्यास मंदिल म्हणतात. जिरेटोप हे युद्धसमयी शत्रूच्या वारापासून मस्तकाचे रक्षण व्हावे म्हणून वापरावयाचे भारी लोखंडी शिरस्त्राण आहे.) उतरवून यमापाशी ठेवतात. यम महार

Read More...


  Buy Book
image  
अश्वेत
Author: Kimantu Omble
Mandakini Prakashan
Language: Marathi
Price: Rs. 125
Pages: 105

दिवस बहरात होता रात्र तीच प्रहरात होती

प्रीतफुले तुझी माझी सये ऐन भरात होती 

 अशी कशी झाली चंद्रमौळी माझी झोपडी?

तू आलीस तेव्हा चर्चा घरा-घरात होती

 गंधारल्या दिशा चारी, चंद्राला आली लाली 

अशी काय जादू तुझ्या मंद श्वासात होती? 

 मंदावल्या चांदण्या नि नक्षत्रे झाली खाली

उगवली चंद्रकोर पुनवेची पापण्यात होती

 थोडी मोगर्‍यात होती, थोडी गजर्‍यात होती

थोडी कंपने सखे तुझ्या धुंद अधरात होती

 नजर तुझी शराबी नि बहाणे तुझे गुलाबी

झंकारली चांदरात अंगांग रोमरोमात होती

 उब तुझ्या मिठीत रेशमी कोवळ्या उन्हाची

शिरशिरी गारव्याची मलमली स्पर्शात होती

 पाहिलेस हसुनी अजुनी तू उगाच लाजुनी

अंबरे तारकांची मुकी थिजली दारात होती

 दरवळली रातराणी, रुणझुणली रात होती

किणकिणली कंकणे कापर्‍या स्वरात होती

 न राहिलो माझा मी, न तुझी तू राहिली

उमलली रात नवी बहरली अंतरात होती

Read More...


  Read E-Book
image  
आनंदऋतू ई-मॅगझिन १० डिसेंबर २०१२
Author: (empty)
Aanandrutu
Language: Marathi
Price: Rs. 00.00
Pages: 35

दर्जेदार कथा आणि कवितांनी सजलेलं मराठीतील अग्रगण्य व न चुकता दर महिन्याच्या १० तारखेला प्रकाशित होणारे एकमेव ई-मॅगझिन

आनंदऋतू ई-मॅगझिन व मोफत ई-बुक्ससाठी आजच सभासद व्हा.

नोंदणीसाठी वेबसाईट:http://aanandrutu.com/registration.php

साहित्य पाठवण्यासाठी ईमेल: aanandrutu@gmail.com;

फेसबुक पेज: https://www.facebook.com/groups/aanandrutu/ 

Read More...


  आनंदऋतू

Promote Your Page Too